
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारूका यांची बदली वर्धा येथे झाली आहे. यानिमित्त जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. न्यायालयीन चाकोरी एक साचेबद्ध असते. मात्र, भारूका यांनी गेल्या वर्षभरात न्यायालयीन कर्मचारी, अधिकारी यांच्यामध्ये चांगले नातेसंबंध निर्माण केले होते. त्यांची वर्धा येथे प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून बदली झाली आहे. जिल्हा न्यायालयाच्या इतिहासात गेली कित्येक वर्ष रखडून असलेला रस्ता भारूका यांच्या कार्यकाळात पूर्ण झाला. नौदल दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कार्यकारी अभियंता यांचा आवर्जून गौरव केला. न्यायव्यवस्था देखील या गोष्टींची दखल घेते हे दाखवून दिले.