कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या रद्द..!

Edited by:
Published on: July 10, 2024 05:36 AM
views 688  views

मडगाव : कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे येथील बोगद्यात रात्री ३ वाजता पुन्हा चिखल जमा झाला. यामुळे पूर्वपदावर आलेली रेल्वे सेवा कोलमडली. वंदे भारत, जनशताब्दी , मांडवी, सावंतवाडी- दिवा व  मुंबई- मंगळुरूसह नऊ गाड्या रद् करण्यात आल्या तर मंगला एक्स्प्रेससह सहा गाड्या आतापर्यंत पनवेल, लोणावळा, पुणे मिरज मडगाव या मार्गे वळवण्यात आलेल्या आहेत.

कोकण रेल्वे मार्गावरील मडुरे ते पेडणे विभागादरम्यान पेडणे बोगद्यात ९ रोजी दुपारी रुळावर पाण्यासह चिखल आला. त्यामुळे रखडलेली रेल्वे सेवा देखभालीच्या कामांनंतर रात्री साडेसहा वाजता पूर्ववत केली. मात्र रात्री ३ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा त्याचठिकाणी पाणी येऊ लागल्याने रेल्वेसेवेवर परिणाम झालेला आहे.  

रद्द केलेल्या गाड्या : 

गाडी क्रमांक २२२२९ मुंबई सीएसएमटी - मडगाव जंक्शन वंदे भारत एक्सप्रेसचा १० रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे. गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी - मडगाव जंक्शन जनशताब्दी एक्स्प्रेसचा १० रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे. गाडी क्र. १०१०३ मुंबई सीएसएमटी - मडगाव जंक्शन मांडवी एक्सप्रेसचा १० रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे. गाडी क्र. १२१३३ मुंबई सीएसएमटी - मंगळुरु जंक्शन एक्सप्रेसचा ९ रोजी सुरु होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.            

गाडी क्र. १०१०४ मडगाव जं.- मुंबई सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेसचा १० रोजी सुरु होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे. गाडी क्र. ५०१०८ मडगाव जं. - सावंतवाडी रोड प्रवासी गाडीचा १० रोजीचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. गाडी क्रमांक २२१२० मडगाव जं.  - मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसचा १० रोजीचा प्रवास रद्द करण्यात आला आहे.  गाडी क्र.  १२०५२ मडगाव जंक्शन - मुंबई सीएसएमटी - जनशताब्दी एक्स्प्रेसचा १० रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.  गाडी क्र. १०१०६ सावंतवाडी रोड - दिवा एक्सप्रेसचा १० रोजीचा प्रवास रद्द करण्यात आला आहे.              

गाडी क्र. १२४४९ मडगाव जं. - चंदीगड एक्स्प्रेसचा १० रोजीचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. गाडी क्र. १२६२० मंगळुरु सेंट्रल - लोकमान्य टिळक (टी) १० रोजीचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. गाडी क्र. १२१३४ मंगळुरु जं. - मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेसचा १० रोजीचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. ५०१०७ सावंतवाडी रोड - मडगाव जं. प्रवासी गाडी १० रोजीचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.


अंशतः रद्द गाड्या :


 गाडी क्र. २०१११ मुंबई सीएसएमटी - मडगाव जं. कोकणकन्या एक्स्प्रेसचा ९ रोजी सुरु झालेला प्रवास सावंतवाडी रोड येथे संपेल व सावंतवाडी रोड - मडगाव जंक्शन दरम्यान अंशतः रद्द केला जाईल. 

 गाडी क्र. १२६१९ लोकमान्य टिळक (टी) - मंगळुरु सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेसचा ९ रोजीचा प्रवास सावंतवाडी रोडपर्यंत असेल. सावंतवाडी रोड - मंगळुरू सेंट्रल दरम्यान अंशतः रद्द केला जाईल.



वळवण्यात आलेल्या गाड्या : 


गाडी क्र. १२६१८ एच. निजामुद्दीन - एर्नाकुलम जं.  मंगला एक्सप्रेसचा ९ रोजीचा प्रवास पनवेल - लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा - मडगाव मार्गे वळवला आहे.

 गाडी क्र. १९५७७ तिरुनेलवेली - जामनगर एक्स्प्रेसचा ९ रोजीचा प्रवास आता कुमता येथून शोरानूर जंक्शन मार्गे वळवला आहे.  

    गाडी क्र. १६३३६ नागरकोइल - गांधीधाम एक्स्प्रेसचा ९ रोजीचा प्रवास  आता उडुपी येथून शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. गाडी क्र.  १२२८३ एर्नाकुलम - एच. निजामुद्दीन एक्स्प्रेसचा ९ रोजीचा प्रवास जोकट्टे येथून शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. गाडी क्र. २२६५५ एर्नाकुलम - एच. निजामुद्दीन एक्स्प्रेसचा १० रोजीचा प्रवास थलास्सेरी येथून शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल - लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेसचा १० रोजीचा प्रवास तिरुअनंतपुरम सेंट्रल येथून १६.५५ वाजता पुन्हा शेड्यूल करण्यात आला व शोरानूर जंक्शन मार्गे वळवण्यात आला. 

 गाडी क्र. १६३४५ लोकमान्य टिळक (टी) - तिरुअनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेसचा ९ रोजी सुरु झालेला प्रवास आता सावंतवाडी रोडला पनवेल-पुणे जंक्शन- सोलापूर जंक्शन मार्गे पाठीमागे वळवण्यात येईल.


 गाडी क्र. २२११३ लोकमान्य टिळक (टी) - कोचुवेली एक्स्प्रेसचा ९ रोजी सुरु झालेला प्रवास सिंधुदुर्ग येथून पनवेल - पुणे जंक्शन - सोलापूर जंक्शन मार्गे पाठीमागे वळवला जाईल.  गाडी क्र. १२४३२ ह. निजामुद्दीन - तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेसचा ९ रोजीचा प्रवास राजापूर रोड येथून पनवेल - पुणे जंक्शन - सोलापूर जंक्शनमार्गे मागे वळवली जाईल. 


 गाडी क्र. १९२६० भावनगर - कोचुवेली एक्स्प्रेसचा ९ रोजी सुरु झालेला प्रवास रत्नागिरी येथून पनवेल - पुणे जंक्शन - सोलापूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. गाडी क्र.  १२२२३ लोकमान्य टिळक (टी) - एर्नाकुलम एक्स्प्रेसचा ९ रोजीचा प्रवास चिपळूण येथून पनवेल-पुणे जंक्शन- सोलापूर जंक्शन मार्गे वळवला जाईल.  गाडी क्र. २०९३२ इंदूर जं.  - कोचुवेली एक्स्प्रेसचा ९ रोजीचा प्रवास ०९/०७/२०२४ रोजी सुरत - जळगाव मार्गे वळवला.

     प्रवाशांनी या गाड्यांच्या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

. . . 

विलंबामुळे प्रवाशांना त्रास

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग मान्सून कालावधीसाठी कमी करण्यात आलेला आहे. त्याशिवाय मध्य रेल्वे विभागात पाणी आल्याने गाड्यांना उशीर होत होता. आता पेडणेतील रुळावरील पाण्यामुळे या मार्गावरील सेवाच कोलमडली आहे. याचा त्रास प्रवास करणार्‍या प्रवाशांना झाला. गाड्यांची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना दुसर्‍या पर्यायाचा शोध घ्यावा लागत आहे. काल साडेपाच तासांच्या प्रतीक्षेनंतर आता पुन्हा अडचणी निर्माण झालेल्या आहेत.