
सावंतवाडी : कुडाळ येथील बँक ऑफ इंडियाच्या व्यवसाय कौशल्य वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहातील बंदिवानांना मेणबत्ती, पणत्यासह अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक सुहास वारके, विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुपेकर व कारागृह महानिरीक्षक दक्षिण विभाग श्री. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण घेण्यात आले.
यावेळी कारागृह अधिक्षक सतिश कांबळे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी संदीप एकशिंगे, तुरुंगाधिकारी संजय मयेकर, बँक ऑफ इंडियाच्या कुडाळ शाखेचे व्यवस्थापक श्री मेश्राम, आर सिटी कार्यालयाचे किशोर राठी व त्यांचे प्रशिक्षक उपस्थित होते. यावेळी कारागृह अधिक्षक सतिश कांबळे यांनी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि बंदीवान कारागृहातून मुक्त झाल्यानंतर त्यांना या प्रशिक्षणाचा फायदा होणार असल्याचे सांगितले. तसेच बंदीवानांच्या उपजीविकेसाठी बँक ऑफ इंडियाकडून कर्ज प्राप्त होणार असल्याने कारागृहाचे ब्रीदवाक्य असलेले सुधारणा व पुनर्वसन हे खऱ्या अर्थाने सार्थकी ठरणार असल्याचे सांगितले. या मेणबत्ती, पणत्यासह अगरबत्ती प्रशिक्षणासाठी कारागृह अधिक्षक सतिश कांबळे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी संदीप एकशिंगे, तुरुंगाधिकारी संजय मयेकर, बँक ऑफ इंडियाच्या कुडाळ शाखेचे व्यवस्थापक श्री मेश्राम, आर सिटी कार्यालयाचे किशोर राठी व त्यांचे प्रशिक्षक यांचे सहकार्य लाभले.