वेंगुर्लेत जलसाक्षरता विषयावर प्रशिक्षण

Edited by:
Published on: November 29, 2024 19:46 PM
views 80  views

वेंगुर्ला : पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन,  राज्य पाणी व स्वच्छता मिशन (SWSM), जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती वेंगुर्ला यांच्या सहकार्याने जे. पी.एस. फाउंडेशन लखनऊ या मुख्य संसाधन केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवशीय निवासी प्रशिक्षण, पाणीपुरवठा योजनेची निगडीत "जलसाक्षरता" या विषयावर येथील साई मंगल कार्यालय व साई दरबार येथे पार पडले. 

सदरच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी गुरुनाथ धुरी   हे उपस्थित होते. त्यांनी जलसाक्षरता अभियानाचे महत्त्व, जलसाक्षरता अभियानातील मुख्य घटक, जलसाक्षरता अभियानाची व्याप्ती इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. सर्वांनी वैयक्तिक नळ जोडणी पूर्ण करून लोकांना शुद्ध स्वच्छ, पुरेसे पाणी पुरवठा करण्याबाबतचे आवाहन ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कुडाळ/ वेंगुर्ला चे उपअभियंता प्रफुल्ल कुमार शिंदे  यांनी केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत स्तरावरील विविध पदाधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दोन दिवस प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या अंमलबजावणी सहाय्य संस्था क्षमता बांधणी व प्रशिक्षण समन्वयक प्रज्ञा सावंत तसेच गट संशोधन केंद्र पाणी व स्वच्छता पंचायत समिती वेंगुर्ल्याच्या द्रोपदी नाईक उपस्थित होत्या. जीपीएस फाउंडेशन लखनऊ या मुख्य संसाधन केंद्राचे तज्ञ प्रशिक्षक निवृत्त उप अभियंता भिवा आयनोडकर  व जयराम जाधव, श्रद्धा खाडे, सोनाली चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. द्रौपदी नाईक व प्रशिक्षण समन्वय श्रद्धा खाडे यांनी सदरच्या प्रशिक्षणाचे प्रभावी नियोजन करून प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केला.