माणगाव हायस्कूलमध्ये शिक्षकांसाठी 5 दिवसांचे प्रशिक्षण वर्ग !

Edited by: भरत केसरकर
Published on: January 16, 2024 07:38 AM
views 269  views

कुडाळ : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग,शिक्षण विभाग पंचायत समिती कुडाळ आयोजित कुडाळ तालुकास्तरीय प्रशिक्षण "अध्ययन प्रकीयेचे व्यवस्थापन व मूल्यमापन आणी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन" या विषयावर पाच दिवसांचे प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन माणगाव हायस्कूल चे मुख्याध्यापक प्रशांत धोंड यांच्या हस्ते करण्यात आले.

     यावेळी व्यासपीठावर प्राचार्य संतोष पवार,केंद्रप्रमुख दिनकर तळवणेकर,मार्गदर्शक बाबाजी भोई,विनायक हारगे,विषयतज्ज्ञ हेमांगी जोशी यासह प्रशिक्षणार्थी शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.अध्ययन प्रकीयेचे व्यवस्थापन यावर वाचन साहीत्य मूलभूत संकल्पना,शिक्षकांसाठी अध्ययन अध्यापन करताना निर्माण होणारे आव्हाने,सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन यावर या पाच दिवसात मार्गदर्शन केले जाणार आहेत.या प्रशिक्षण वर्गात वाडोस व माणगाव बीटातील तब्बल ५४ शिक्षक व शिक्षिका सहभाग घेत आहेत.

        मुलांना बदलत्या परिस्थितीत आणी काळानुसार शिक्षण देणे ही काळाची गरज आहे.हे ओळखून शासनाने अशा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे.याचा परिपूर्ण फायदा घेवून आधुनिक भारताची पुढील पिढी घडवा.असे भावनिक आवाहन माणगाव हायस्कूल चे मुख्याध्यापक प्रशांत धोंड यांनी केले. तसेच या प्रशिक्षणासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन प्रशांत धोंड यांनी दिले.