
सावंतवाडी : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच प्रशिक्षण सावंतवाडी कळसुलकर हायस्कूल येथे पार पडल. ५२ ग्रामपंचायतीसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तब्बल ८०० हून अधिक मतदान अधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकीसाठी प्रशिक्षण देण्यात आल. तहसीलदार श्रीधर पाटील, निवडणूक नायब तहसीलदार लता वाडकर, महसूल नायब तहसीलदार मनोज मुसळे आदींनु हे प्रशिक्षण दिल.
येत्या १८ डिसेंबर रोजी या ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. या नामनिर्देशन पत्रांची छाननी ५ डिसेंबर रोजी व उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ७ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. या निवडणुकीच मतदान १८ डिसेंबर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत तर मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार आहे. 52 ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी १९३ तर ९१० जणांनी सदस्य पदासाठी नामनिर्देशन दाखल केली आहेत.