आचरा रस्त्यावरील वाहतुक ठप्प

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 22, 2023 15:22 PM
views 485  views

कणकवली : वरवडे येथे पाणी आल्याने आचरा रस्ता येथील वाहतुक ठप्प झाली आहे. सिंधुदुर्ग मध्ये मुसळधार पाऊस पडत कणकवली मध्ये देखील 94 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गणपती साना व वरवडे फणस नगर येथे सकल रस्त्यावर पाणी भरल्याने आचरा वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाच्या वतीने नदीकाठी असणाऱ्या गावांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. कणकवलीत पाऊस जरी कमी पडत असला तरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.