फोंडाघाट मधील वाहतूक पूर्ववत सुरू..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 09, 2023 17:13 PM
views 843  views

कणकवली : सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर दरड कोसळली होती. पिडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी मंत्र्यांच्या दौऱ्यात व्यस्त असतानाही घटनास्थळ गाठून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित केली. साडे अकरा वाजता रस्त्यावर कोसळलेली दरड जेसीबीच्या सहाय्याने दुपारी १ वाजता पूर्णपणे बाजूला हटवली आणि दुतर्फा वाहतूक सुरळीत केली. उपअभियंता विनायक जोशी, उपअभियंता श्रीमती प्रभू, शाखा अभियंता प्रमोद कांबळे,राहुल पवार शाखा अभियंता आदींनी तत्परतेने दरड हटविण्यासाठी नियोजन केले.