LIVE UPDATES

खारेपाटण तालुका निर्मितीला व्यापारी , रिक्षा संघटनेचा पाठिंबा

२७ सप्टेंबर रोजी कडकडीत बंद पाळून तालुका निर्मिती महामेळाव्यात सहभागी होण्याचा निर्धार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 22, 2026 10:51 AM
views 20  views
#kokansadlive#news update#konkan update#

खारेपाटण : खारेपाटण तालुका निर्मितीच्या मागणीला आता व्यापारी तसेच रिक्षा संघटनेनेही पाठिंबा जाहीर केला आहे. खारेपाटण तालुका निर्मिती कृती समिती, व्यापारी असोसिएशन खारेपाटण आणि रिक्षा संघटना खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने विष्णू मंदिर येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत खारेपाटण तालुका निर्मितीचा महामेळावा यशस्वी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुका निर्मितीच्या मागणीला पाठिंबा दर्शवत रविवार, २७ सप्टेंबर रोजी खारेपाटण शहरात कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीचे उपाध्यक्ष मंगेश गुरव खजिनदार महेश कोळसुलकर सचिव संतोष पाटणकर सदस्य  संकेत शेटे उपस्थित होते तसेच व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष मंगेश ब्रह्मदंडे रोटरी क्लबचे अध्यक्ष तसेच रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सुरळकर व्यापारी संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक  प्रशांत गाठे,  प्रदीप मोहिरे  गणेश लवेकर हर्षल पोरे, केतन आलते राजेंद्र वरूनकर, झुंजार मंडळाचे अध्यक्ष तसेच तालुका समितीचे सदस्य संकेत शेटे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते

27 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या खारेपाटण तालुका निर्मिती महामेळाव्यास व्यापारी आणि रिक्षा व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, तालुका निर्मितीच्या मागणीसाठी एकजुटीचे दर्शन घडविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला व सर्व सामाजिक संघटना ,विविध संस्था मंडळे याना सोबत घेऊन हा  महानिर्धार  मेळावा यशस्वी करणार असल्याचे गुरव यांनी बोलताना सांगितले

त्यामुळे खारेपाटण तालुका निर्मितीच्या मागणीसाठी विविध घटक एकत्र येत असल्याने आगामी महामेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.