
सिंधुदुर्गनगरी : पुण्याहून जीवाचं गोवा करण्यास हीलेल्या आणि पुन्हा जीवाचं गोवा करून पुण्याला परत जात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका सीएनजी पंपावर केलेली दादागिरी या सर्व पर्यटकांना महागात पडली आणि गोव्यातील नशा सिंधुदुर्गात उतरली मात्र हे सर्व महाविद्यालय विद्यार्थी असल्याने आणि त्यांचे भविष्य बाद होऊ नये या उदात्तहेतूने जिल्हा वाशीयांनी त्यांना केवळ चोप देऊन सोडून दिले.
पुणे येथून काही तरुण पर्यटक गोव्याला पर्यटनासाठी गेले होते.गोव्यात पर्यटन केल्यानंतर हे पर्यटक सिंधुदुर्ग मार्गे पुन्हा गोव्याला जाण्यासाठी निघाले.हे पर्यटक सिंधुदुर्गातील एका सी एन जी पेट्रोल पंपा वर सी एन जी भरण्यासाठी थांबले या पंपावरील कर्मचाऱ्यांनी सीएनजी भरण्यासाठी गाडीत असलेल्या सर्वांना खाली उतरण्यास सांगितले. मात्र हे सर्व पर्यटक खाली उतरण्यास तयार झाले नाहीत. त्याबरोबरच त्यांनी त्या पेट्रोल पंपावरील त्या कर्मचाऱ्याला शिव्या देण्यास सुरुवात केली. यानंतर तिथे उपस्थित असलेल्या काही जणांनी गाडीतून खाली उतरा तर सीएनजी भरेल असे सांगितले.
मात्र, त्यांनाही ते ऐकले नाहीत उलट शिव्या देत त्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. हे पाहताच आजूबाजूच्या रिक्षाचालक तसेच स्थानिक आदींनी संबंधित पर्यटकांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनाही त्यांनी महाराणा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोनदा ईरटीका कार मधून आलेल्या सर्व पर्यटकांनी खाली उतरून मारण्यास सुरुवात केली. यावेळी या पंपावर मोठा राडा झाला. शेवटी यातील काही पर्यटकांनी आपल्या गाड्यांमध्ये बसून तिथून पळ पळ काढला मात्र पाच ते सहा जण स्थानिकांच्या हातात सापडले. त्यांना चांगला मालवणी चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले मात्र हे सर्व पर्यटक तरुण आणि महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांचं भवितव्य अंधारात जाऊ नये असा उदात्त हेतू ठेवत या सर्व पर्यटकांना अखेर सोडण्यात आले. मात्र, या राड्यामध्ये गाड्यांचे नुकसान झाले.