
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या टुरिस्ट रिसेप्शन सेंटर संपूर्ण नूतनीकरण करण्यासाठी तीन कोटी 50 लाख रुपये महाराष्ट्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली.
दरम्यान, सावंतवाडी टुरिस्ट रिसेप्शन सेंटरची मुदत संपली असून इमारतीचं पूर्ण नूतनीकरण करणे आवश्यक आहे.सदर सेंटर हे दयनीय अवस्थेमध्ये आहे. नूतनीकरण केल्यानंतरच नगर परिषदेने टेंडरची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी श्री. साळगावकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.