
कणकवली : कणकवली पर्यटन महोत्सव 05 जानेवरी ते 08 जानेवारी (गुरुवार ते रविवार)या चार दिवसांत होणार आहे.गेले दोन वर्षे कोविड असल्याने होऊ शकला नाही.या पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ 5 जानेवारीला भव्य शोभायात्रेने होईल,अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.हा महोत्सव नगरपंचायत निधीतून एकही रुपयांचा निधी घेतला जाणार नाही,आ.नितेश राणे व आमच्या सर्व नगरसेवक व नगर अध्यक्ष याच्या माध्यमातून हा महोत्सव साजरा केला जाणार आहे.
कणकवली नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,गटनेते संजय कामतेकर,अण्णा कोदे,विराज भोसले,संदीप नलावडे,किशोर राणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
त्या निमित्ताने 4 जानेवारी रोजी लहान व मोठ्या मुलाच्या चित्रकला स्पर्धा नगरवाचनालय हॉल येथे होणार आहे.या चित्रकला स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नामांनद मोडक यांच्याशी संपर्क साधावा. या महोत्सवात स्टॉल साठी गटनेते संजय कामतेकर यांच्याकडे संपर्क साधावा.
दुसऱ्या दिवशी 5 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रा व चित्ररथ सायंकाळी 5 वाजता पटकीदेवी मंदिर ते ढालकाठी मार्गे, नाका आप्पासाहेब चौक ते महोत्सव स्थळापर्यंत उप जिहा रुणालय समोरील मैदानापर्यंत जातील.(17 चित्ररथ सहभागी चित्ररथांना सजावटी साठी 10,000 रुपये मदत करण्यात येणार आहे).कार्यक्रम स्थळी फुड फेस्टीवल उदघाटन नगरपंचायत कणकवली व रोटरी क्लब यांच्या समवेत कार्यक्रम सांय 6.30 वाजता होणार आहे.
तसेच चित्रकला स्पर्धेतील चित्रांचे प्रदर्शन होणार आहे.
कणकवली पर्यटन महोत्सव 2023 कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ पालकमंत्री रविंद्र चव्हाण,आ. नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे,माजी आमदार प्रमोद जठार इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत सांय 7.30 वाजता होणार आहे.रात्री 8 वाजता मुंबई येथील ऑर्केस्ट्रा आणि टी.व्ही. मधील कलाकारांचा धमाल कॉमेडी शो होणार आहे.
तिसऱ्या दिवशी 6 जानेवारी फॅशन शो 6 ते 8 वाजता लहान मुलांचा 15 वर्षाखालील मुले कार्यक्रम होईल.तसेच रात्री 8 वाजाता आम्ही कणकवलीकर कणकवली शहरातील व आजुबाजुच्या परिसरातील भरगच्च 200 नामवंत कलाकारांसहीत संगीत, नृत्य व कॉमेडी असा रंगीत कार्यक्रम सुहास वरुणकर, संजय मालंडकर व प्रा.हरीभाऊ भिसे यांच्या संकल्पनेतून साकारलेला कार्यक्रम होईल.
तसेच 7 जानेवारी तिसऱ्या दिवशी मराठी कलाकारांचा कॉमेडी एक्सप्रेस कार्यक्रम व संगीत रजनी (म्युझिकल नाईट) सांय 8.00 वाजता होणार आहे.शेवटच्या दिवशी
8 जानेवारीला कणकवली पर्यटन महोत्सव 2023 कार्यक्रमाचा समारोप समारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे , विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर , आमदार नितेश राणे व इतर मान्यवर यांच्या उपस्थित राहणार आहे.त्यानंतर हिंदी कलाकारांचा व सेलिबेटींच्या उपस्थितीत लाईव्ह ऑर्केस्ट्रा कार्यक्रम सांय 8 वाजता होणार आहे,असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.