रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे एसटी कलंडली..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 16, 2023 17:31 PM
views 801  views

देवगड : देवगड आगारातून सकाळी ८.१५ वा सुटणारी देवगड आरे - निरोम गाडी हि सकाळी 8.15 वा सुटणारी गाडी कणकवली देवगडच्या दिशेने येत असताना तोरसोळे पारवळवाडी फाट्याजवळ रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे एसटी रस्त्याच्या बाजूला गेली व एसटीच्या डाव्या बाजुचा रस्ता खचला व एसटी कलंडली त्यामुळे होणारा मोठा अनर्थ टळला.

सदरची घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. दुपारची वेळ व रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे गाडीमध्ये प्रवासी नसल्यामुळे अनर्थ टळला मात्र घटनेची माहिती मिळताच देवगड आगारातील अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.परंतु पंधरा दिवसापूर्वी देवगड आगारात १० ते १२ पर जिल्ह्यातील वाहक कम चालक नव्याने हजर झाल्यामुळे कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा अंदाज येत नसल्यामुळे अशा घटना घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहक किंवा चालक नवीन असेल तर त्याबरोबर अनुभवी चालक किंवा वाहक पाठवावा अशी मागणी उपस्थित केली जात आहे.