
सिंधुदुर्ग : जगभरातल्या कोकणवासीयांनी आपल्या हदयात दिलेलं स्थान आणि त्यामुळं कोकणवासीयांचं लोकव्यासपीठ बनलेलं कोकणचं नंबर वन महाचॅनेल कोकणसाद LIVE नव्या वर्षातही टीआरपीचा महाबाप ठरलंय. सोशल मिडीयाच्या नुकत्याच जाहिर झालेल्या अधिकृत आकडेवारीत कोकणसाद LIVE नं नव्या वर्षांत पुन्हा उत्तुंग भरारी घेतली आहे.
डिजिटल मिडीयाचं नवं क्रांतीपर्व सर्वात प्रथम तळकोकणात सुरू करणा-या कोकणसाद LIVE नं गेली 9 वर्षे कोकणवासियांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलंय. आमचं काम बोलतं आणि आमचे आकडे बोलतात, अशी भूमिका मोठा आत्मविश्वासानं जगासमोर मांडत महाचॅनेलच्या टीमनं अनेक आव्हानं पार केली. कोकणच्या मातीशी एकरूप झालेली पत्रकारीता आणि त्याही पलिकडं जपलेली सामाजिक बांधीलकी यामुळंच आज जगभरातल्या कोकणवासीयांनी गेल्या दहा वर्षात महाचॅनेलचं अव्वल स्थान कायम ठेवलंय.
कोकणसाद लाईव्ह हे तळकोकणातील असं एकमेव प्रसारमाध्यम आहे, ज्याच्याकडं डिजिटल मिडीया, केबल टिव्ही नेटवर्क, दैनिक आणि साप्ताहीक असे चारही प्लॅटफार्म एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळेच हे प्रसारमाध्यम सुरवातीपासूनच नंबर 1 ठरलं आहे.
आज महाचॅनेलच्या प्रत्येक लाईव्हला, प्रत्येक स्पेशल शो ला आणि प्रत्येक बातमीपत्राला दुबई, युएसए, चीन, अमेरीका इथुन कोकणवासीय जोडले जातात. खास मालवणी भाषेचा आग्रह धरतात. त्यामुळंच आज कोकणसाद LIVE हे त्यांच्या हक्काचं महाचॅनेल बनलंय. आमचे आकडेच बोलतात, हे मोठया अभिमानानं आम्ही सांगतो, याचा हा घ्या पुरावा....
आमचे युटयुब सब्स्क्रायबर, 2, 70,000 हुन अधिक, 98,000 पेक्षा जास्त फेसबुक फॉलोअर्स, वेबसाईटचे 18,00,000 हून अधिक व्हिजीटर्स, 2,80,000 हून अधिक वॉटसअॅप युजर्स, व्टीटरचे 1500 हून अधिक फॉलोअर्स, इन्स्टॅग्रॅम 4,500 हून अधिक फॉलोअर्स, मोबाईल अॅपचे 12,000 हून अधिक युजर्स, टेलेग्राम न्युज ग्रुपवरही लक्षणीय संख्या आहे तर आमच्या केबल टीव्ही नेटवर्कचे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोव्यात 3,25,000 हून अधिक कनेक्शन्स आहेत. मिडीया क्षेत्रात नवा विक्रम करणारी ही आकडेवारी आहे. म्हणुनच आमचे आकडे बोलतात. आणि आता तर याला सोशल मिडीयाच्या अधिकृत टीआरपीत आकडेवारीतही नंबर वन मिळालाय.
हे फक्त आणि फक्त शक्य झालं ते कोकणवासीयांच्या आमच्या वरील अतुट विश्वासामुळं. आमचं पाठबळ असंच वाढत राहील, आणि एक दिवस दाही दिशांना केवळ कोकणसाद LIVE चा आवाज घुमणार, तो दिवस आता दुर नाही. आम्हाला नव्या वर्षातही टीआरपीत अव्वल स्थानावर ठेवणा-या जगभरातल्या आमच्या कोकणवासीयांना पुन्हा एकदा त्रिवार सलाम...