उद्या महिलांना “द केरला स्टोरी” सिनेमा मोफत पाहता येणार..!

आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली येथे पाहता येणार हा सिनेमा
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 13, 2023 12:29 PM
views 283  views

कणकवली : सद्या देशामध्ये घडत असलेल्या लव्ह जिहादच्या प्रकरणांवर आधारीत बहुचर्चीत "द केरला स्टोरी" हा सिनेमा वास्तवदर्शी असून प्रत्येक महिला पालकांना पाहता येणार आहे. हा सिनेमा पाहणे अत्यंत जरूरीचे आहे.यासाठी कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी रविवार दिनांक १४/५/२०२३ रोजी लक्ष्मी चित्रमंदिर कणकवली येथे दुपारी १२.३० वाजताचा होणारा शो खास महिलांसाठी मोफत दाखविण्याची व्यवस्था केली आहे. जास्तीत जास्त महिला प्रेक्षकांनी सदरहू चित्रपट पहावा, असे आवाहन करण्यात आले आहे.