सावंतवाडीत उद्या ''सांज पाडवा" !

दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचं आयोजन
Edited by: विनायक गावस
Published on: October 25, 2022 21:54 PM
views 393  views

सावंतवाडी : पाडवा व भाऊबीजेच औचित्य साधून दीपकभाई केसरकर मित्रमंडळातर्फे उद्या संध्याकाळी ठीक 7.00 वाजता केशवसुत कट्टा येथे ''सांज पाडवा" या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे. मोती तलावाच्या मध्यभागी होणारा हा कार्यक्रम सावंतवाडीकरांसाठी विशेष पर्वणी ठरणार असून नामांकित गायक सदाबहार नजराणा सादर करणार आहेत. यावेळी उपस्थित राहत या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचे बाबू कुडतरकर, राजन पोकळे, आबा केसरकर, सुजित कोरगावकर, अनारोजिन लोबो, भारती मोरे, निता कविटकर, दिपाली सावंत, सुरेंद्र बांदेकर यांसह कार्यकर्त्यांकडून करण्यात आल आहे.