हातीवले टोल नाका बंद पाडणार | निलेश राणे आक्रमक !

गुरुवारी राजापुरात जाऊन टोल पाडणार बंद !
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 21, 2022 17:01 PM
views 229  views

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गाच्या चौपादरीकरणाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करू नये, अशी जनतेची आग्रही मागणी असतानाही राजापूर तालुक्यातील हातीवले गावात बुधवार पासून टोल वसुलीला सुरुवात झाली आहे. याविरुद्ध भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे आक्रमक झाले असून याचा जाब विचारण्यासाठी गुरुवारी ते राजापूरात दाखल होतं आहेत. 


रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली सात वर्षाहून अधिक काल उलटला तरीही पूर्ण झालेले नाही. हे काम पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही टोल वसुली करू नये अशी जनतेची आग्रही मागणी होती. तरीही राजापूर तालुक्यातील हातीवले येथे टोल नाका उभारण्यात आला.


याबाबत तेथील जनतेने माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेतली होती. टोल वसुलीला विरोध नाही. मात्र महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही टोल वसुली करू नये अशी भूमिका निलेश राणे यांनीही घेतली होती.


त्यानंतर वसुलीची प्रक्रिया थांबली होती. मात्र आता पुन्हा बुधवारपासून हातीवले येथे टोल वसुलीला सुरुवात झाली. ही वसुली अनधिकृत असून उद्या मी माझ्या सहकाऱ्यांसोबत १० वाजता स्वतः टोल वर जाणार आणि टोल बंद पाडणार, टोलला विरोध नाही पण काम पूर्ण होईपर्यंत आणि इतर विषय सुटल्याशिवाय टोल सुरू करायला देणार नाही, अशी आक्रमक भूमिका निलेश राणे घेतली आहे. तसे ट्विट त्यांनी केले आहे.