आमदार अपात्रतेबाबत आजची सुनावणी संपली..!

Edited by:
Published on: September 25, 2023 19:32 PM
views 221  views

मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षादरम्यान महत्त्वाच्या असलेल्या आमदार अपात्रतेची सुनावणी नुकतीच पार पडली. आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष होतं. एकूण ३४ याचिकांवर आज सुनावणी पार पडणार होती. त्यामुळे आमदार अपात्रेबाबत आज मोठा निर्णय येण्याची शक्यता होती. आजची सुनावणी संपली असून पुढील सुनावणीसाठी वेळापत्रक आखण्यात येणार असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली. सुनावणी संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.