
सिंधुदुर्ग : आरडीएक्स असलेला एक टँकर गुजरातमधून गोव्यात यायला निघाल्याची माहिती मुंबई पोलीस कंट्रोल रूममधून गोवा पोलिसांना मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर गोवा सीमेवरील चेकपोस्टवर नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलिसांनीही नाकाबंदी केली असून, हा संशयित टँकर रत्नागिरीमध्ये पकडल्याची माहिती मिळत असून रत्नागिरी पोलीस त्याची कसून चौकशी करत असल्याचं कळतंय.