हळवल फाटा येथील अपघात रोखण्यासाठी उद्या ठिय्या आंदोलन

कणकवली पोलिसांनी बजावली नोटीस;उद्या सकाळी होणार ठिय्या आंदोलन
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 09, 2023 17:31 PM
views 672  views

कणकवली: मुंबई गोवा महामार्गावर  हळवल फाटा येथील वळणावर सातत्याने अपघात होत आहे.या ठिकाणी अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे.चुकीच्या पद्धतीने केलेल्या रस्त्यांमुळे हे अपघात होत आहेत.या अपघाताची जबाबदारी कोण घेणार? याबाबत मा. उप विभागीय अधिकारी यांना पत्र दि. 25 जानेवारी 2023 दिले होते.याबाबत कोणतेही उत्तर किंवा कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे उद्या सकाळी अपघात रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री ठिय्या आंदोलनावर ठाम आहेत.त्यामुळे कणकवली पोलिसांनी १४९ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई होईल,अशी नोटीस श्री.मेस्त्री यांना बजावण्यात आली आहे.

बाळू मेस्त्री यांनी पोलिसांना पाठवलेले पत्र, राष्ट्रीय महामार्ग ६६, कणकवली परिसरातील होणाऱ्या आपघातांबाबत व जीवितहानी बाबत मी शासन दरबारी पत्र व्यवहार केला होता. आज दि. 09/02/ 2023 पर्यंत संबंधित यंत्रणेकडून कोणताही ठोस, न्याय्य निर्णय झालेला नाही. तसेच तसे होतानाचा प्रयत्नही दिसत नाही. सबब शासन दरबारी या आपघातान बाबत जाग आणण्यासाठी उदय दि. 10/02/23 रोजी हळवल फाटा येथे ठिय्या आंदोलनास बसणार आहे. आपल्यास माहितीस्तव ही पत्र आपणास देत आहे.