
कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली . प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे कांबळे सर व पर्यवेक्षक अच्युतराव वणवे सर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विद्यार्थांना थोर पुरुष लोकमान्य टिळक व मराठीतील प्रतिभावंत लेखक अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र सांगून विद्यार्थांच्या मनात देशभक्ती जागृत केली . लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे हे दोघेही जागतिक किर्तीचे दिग्गज राष्ट्रपुरुष होते. आपल्या प्रतिभेच्या बळावर पारतंत्र्याच्या शृंखला झुगारून देशाला स्वातंत्र्य करण्याची ऊर्जा दिली . दोघांचेही चरित्र आदर्श आहे . विद्यार्थांनी टिळकांचे व अण्णा भाऊ साठे यांचे चरित्र वाचून जीवनात आचरण करावे असे प्रतिपादन करण्यात आले . सांस्कृतीक विभाग प्रमुख जनार्दन शेळके सर, संदिप कदम सर, मुंडले मॅडम , मनिषा पाटील मॅडम, नाईक,साटम व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते .