
वेंगुर्ला : वेंगुर्ले कॅम्प येथील वेंगुर्ले हायस्कूल नजीकच्या मैदानावर शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुका शिवसेना व दीपकभाई मित्रमंडळ यांच्या वतीने व जय मानसीश्वर संघ, वेंगुर्ला व उभादांडा मित्रमंडळाने आयोजित केलेल्या खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हा समन्वयक तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, जिल्हा संघटक तथा माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, युवासेना जिल्हा प्रमुख हर्षद डेरे, शहरप्रमुख संतोष परब, महिला शहर संघटिक मनाली परब, शबाना शेख, कार्मीस आलमेडा, उभादांडा ग्रा प सदस्य राधाकृष्ण पेडणेकर, परबवाडा ग्रा प सदस्य हेमंत गावडे, खर्डेकर महाविद्यालयाचे शिक्षक श्री नाईक, माजी उपनगराध्यक्ष यशवंत किनळेकर, राजू परब, प्रीतम सावंत यांच्यासाहित इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाहित गोवा, कोल्हापूर, बेळगाव आदी भागातील संघ सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे सॅमसन फर्नांडिस यांनी स्वागत केले.