कणकवलीत रेल्वेच्या धडकेत तीन गवारेडे ठार

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 19, 2023 12:53 PM
views 798  views

कणकवली : मडगावच्या दिशेने जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसची धडक बसून बोर्डवे रेल्वे फटका नजीक तीन गवेरेडे ठार झाले. ही घटना शुक्रवारी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास घडली.


मोटरमन कडून याबाबत माहिती मिळतच कणकवली रेल्वे स्टेशन वरील आरपीएफ कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच याबाबत वनविभागाला देखील माहिती देण्यात आली. गवा रेड्यांना बसलेली रेल्वेची धडक ही एवढी जोरात होती की यात काही गवे ट्रॅक पासून दूरवर जाऊन पडले. तर काही एका गव्याचा अक्षरशा मांसाचा सडा रेल्वे ट्रॅक वर पडला होता.