
सावंतवाडी: भुमीअभिलेख कार्यालय उपअधिक्षक श्रीमती प्रियदा नामदेव साकोरे यांची नवसरणी तिठा (चौक) येथे गाडीच्या समोर येत एका इसमान गाडी अडवत शिवीगाळ करुन बघुन घेतो, अशी धमकी दिल्याची घटना सावंतवाडीत घडली असून या बाबत पोलीस ठाण्यात उप अधीक्षकांकडून कायदेशिर तक्रार करण्यात आली आहे.
उपअधिक्षक भुमीअभिलेख कार्यालय सालईवाडा सावंतवाडी येथे कार्यरत आहे. मी कार्यभार संभाळत असताना माझे कार्यालयात असताना दिलीप महादेव नाईक रा. सावंतवाडी तर्फे कूळ अखत्यारी म्हणून लक्ष्मीकांत बाबूराव सांगावकर रा. माठेवाडा सावंतवाडी याने मौजे भैरववाडी कारीवडे येथील जर्मिन सर्वे नं.-75 हिस्सा नं.-5 या जमिनीची हद्दकायम मोजणी करणेकरीता अतिअतितातडी मोरनं. 78/2022नूसार माहे फेब्रुवारी 2022 रोजी अर्ज केलेला होता. त्याची मोजणी प्रक्रिया पुर्ण केलेली होती. त्यानंतर त्या मोजणीची क प्रत नकाशा तयार करुन देण्यात आलेला होता. या मोजणीचा नकाशा मोजणी अर्जदार यांना मान्य नसल्याने त्यांनी माझे विरोधात वरिष्ठ कार्यालयात व राजकिय पदाधिकारी यांचेकडे लेखी तक्रारी अर्ज केलेला होता. तसेच त्या अनुषंघाने मा. जिल्हा अधीक्षक, भूमी अभीलेख सिंधुदुर्ग यांनी सदर प्रकरणी रितसर चौकशी करुन सर्वे नं. 75 व सर्वे नं 67 यांच्या मुळ अभीलेखात तांत्रिक दोष असल्याने उक्त प्रकरण संयुक्त मोजणी करुन फेरचौकशीकामी माहे डिसेंबर 2022 माझे कार्यालयात पाठविलेले होते. त्यानुसार माझे कार्यालयातील भुमापक यांनी दि. 30/01/2023 रोजी सर्वे नं. 75 व सर्वे नं 67 यांची संयुक्त मोजणी पुर्ण केलेली होती.
उक्त प्रकरण सद्य स्थितीस कार्यालयात चौकशी करुन निर्णय घेण्यावर प्रलंबित आहे. सदरबाबत अर्जदार कूळअखत्यारी म्हणून लक्ष्मीकांत बाबूराव सांगावकर यांना माहीती दिली होती. तसे असतानांही कूळअखत्यारी म्हणून लक्ष्मीकांत बाबूराव सांगावकर यांनी सातबारा प्रमाणे नकाशाचे क्षेत्र भरुन द्या व रस्ता माझ्या क्षेत्रामध्ये दाखवा, असा तगादा लावलेला होता. त्यावेळी त्याने माझे सांगणेप्रमाणे काम करा नाहीतर तुम्हाला काय ते दाखवतो, गप्प बसणार नाही, अश्याप्रकारे धमकावले व मला माझ्या आईवडीलांवरून कार्यालयामध्ये शिवीगाळ केलेली होती. त्याकडे मी दुर्लक्ष केलेला होता. तरी देखील मी त्याचे कोणतेही बोलणेस बळी पडलेले नाही. मी माझे शासकिय काम नियमानुसार करित आलेले आहे. आज 20/02/2023 रोजी दुपारी सरकारी कामानिमित्त माझ्या खाजगी गाडीने ओरोस सिंधुदुर्ग येथे माझ्या स्टाफसह गेलेली होती. ओरोस येथील काम संपवुन सायंकाळी 07.15 वा. च्या सुमारांस सावंतवाडी येथे येण्यास निघाले. मी सावंतवाडीस पोहोचल्यानंतर माझ्या सोबत असलेला स्टाफ मी कार्यालय येथे उतरुन सावंतवाडी जेलच्या पाठीमागील रस्त्याने माझ्या ताब्यातील आय 10 गाडी नं. MH-14- HD 6232 ही एकटीच चालवुन माझे राहते घरी जात असतांना नवसरणी तिठा (चौक) येथे आलेवर माझ्या गाडीच्या समोर एक इसम उभा राहुन माझी गाडी 07.55 वाजता अडविली. मी गाडीतून पाहीले असता, कूळअखत्यारी लक्ष्मीकांत बाबूराव सांगावकर हा असल्याचे मी पाहीले. त्याने मला पाहुन शिवीगाळ करुन बघुन घेतो अशी धमकी दिल्याने माझी त्यांचेविरुद्ध माझी कायदेशिर तक्रार आहे असं एफ आय आर मध्ये नमुद करण्यात आल आहे.