
सावंतवाडी : स्वातंत्र्यदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष प्रा. सतिश बागवे, सदस्य रवी जाधव यांनी दिली आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त सावंतवाडी नगरपरिषद कंत्राटी तत्वावर सफाई कर्मचारी, तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सफाई कर्मचारी महिला यांचा सत्कार करून, या 90 कर्मचाऱ्यांना शिधा वाटप तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाला वेळोवेळी हात लावणाऱ्या दानशूर नागरिकांचा देखील सत्कार होणार आहे असे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी सांगितले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक सुभाष गोवेकर, तर शहरातील व्यावसायिक व दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे शैलेश पई या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाची दखल घेणाऱ्या शहरातील नागरिकांनी या सेवाभावी कार्यक्रमाला उद्या दिनांक 15 ऑगस्ट 2025 दुपारी 3 वाजता गोविंद चित्रमंदिर येथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी नम्र विनंती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्यांकडून करण्यात आली आहे.