
कणकवली : शहरातील जि. प. शाळा नंबर २ व अंगणवाडी परिसरात असलेल्या एका चाळीतून शाळा व अंगणवाडीकडे येणाऱ्या रस्त्यावर सांडपाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पायवाटेवर सांडपाणी सोडण्यात आल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांना शाळेत ना मुठीत धरून ये जा करावी लागत आहे. त्यामुळे त्या चाळीतून सांडपाणी सोडणाऱ्याना न. सांडपाणी निचरा करण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना नगरपंचायत प्रशासनाने करावी, अशी मागणी बांधकरवाडी येथील नागरिकांनी न. पं.च्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जि. प. शाळा नंबर २ व अंगणवाडीकडे येणाºया असलेल्या रस्त्यावर एका चाळीतून सांडपाणी सोडण्यात येत आहे. बांधकरवाडी दत्तमंदिर रस्ता व शाळेकडे येणाºया रस्त्यावर सांडपाणी साचत असल्यामुळे या परिसरात दुगंर्धी पसरली आहे. रस्त्यावर सांडपाणी साचल्यामुळे विद्यार्थी व पालकांना या साडपाण्यातून शाळेत ये जा करावी लागत आहे. त्यामुळे त्या चाळीत राहणाºयांना रस्त्यावर सांडपाणी न सोडता. त्या पाण्याचा योग्य तो निचरा करण्याची सूचना न. प. प्रशासनाने करावी, अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.
निवेदनदेतेवेळी ग्रामस्थ उपस्थित होते. निवेदनाद्वारे प्रणया मेस्त्री, गंधारी म्हापणकर, संचिता कासले, प्रमिला ङ्कालंडकर, दुर्वा सुर्वे, रेणुका पवार,सुनील गुप्ता, अंकिता कोळी, मिताली घाडीगावकर, निधी तेली, मीनाक्षी सुतार, मनीषा वायंगणकर, मंगला माहडिक, नीलम कोरगावकर, वेदिका नाईक, किशोर कदम, रविराज कदम, दिव्या साळगावकर, योगिता मेस्त्री, कोमल पवार, राजश्री धोत्रे, रेहमथ तैला मल्ला, संजना साटम, संगिता राणे, शुभांगी नार्वेकर, सुप्रिया कवटकर, सागर म्हापणकर, विजया चव्हाण, सुरेश पोयेकर, प्रणिता चव्हाण, रिया पाताडे, प्रियांका भोगले, सुनिता तेली, प्रणाली सुतार, रुपाली चव्हाण, स्वाती कदम, योद्धा राणे, वंदना राणे, प्राजक्ता सावंत यांच्या सह्या आहेत.