विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले

Edited by: विनायक गावस
Published on: June 26, 2023 21:36 PM
views 173  views

सावंतवाडी : विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांवर आज आरटीओकडून कारवाई करण्यात आली. शहरातील तहसील कार्यालयासमोर ही मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये १५ तहसील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेमुळे विना हेल्मेटह गाडी चालवणाऱ्यांचे धाबे चांगले दणाणले आहेत. 


 दुचाकी अपघातांची वाढती संख्या आणि मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुध्दा आता हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पोलिस आणि अन्य शासकीय कर्मचार्‍यांना सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हा परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांनी सर्व विभागाना दिलेत.  मात्र हे आदेश जे कर्मचारी पाळणार नाहीत त्यांच्यावर कार्यालयाच्या परिसरात असणारे सीसीटिव्ही फुटेज तपासून कारवाई करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. 


राज्यात हेल्मेट सक्ती झाल्यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात हॅल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक जिल्हा परिवहन विभागाकडुन काढण्यात आले आहे. यात पहिल्या टप्प्यात पोलिस आणि अन्य शासकीय कर्मचार्‍यांना हे आदेश बंधनकारक आहेत. त्यानुसार आरटीओ कार्यालयाकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्या नोटीसीनुसार सर्व कार्यालयीन कर्मचार्‍यांना कळविण्यात यावे तसेच हॅल्मेट वापरण्याबाबत त्यांच्यात जनजागृती करण्यात यावी तसेच त्यांनी हॅल्मेट न वापरल्यास कार्यालय परिसरातील सीसीटिव्ही फुटेजचा आधार घेवून आरटीओ कार्यालयाला माहिती द्यावी. त्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असे त्या पत्रात म्हटले आहे.