चार बाय चारचे बॅनर न लावणारे चाळीस बाय चाळीसची होर्डींग्ज लावतायत ; पैसा आला कुठून : मायकल डिसोझा

Edited by: विनायक गावस
Published on: June 20, 2023 14:57 PM
views 123  views

सावंतवाडी : आज गद्दारांचा दिवस आहे. पण, सावंतवाडी मतदारसंघातील आमदार हे महाराष्ट्रातील महगद्दार आहेत. पहिली ते कॉंग्रेसमध्ये होते तिथे नाराज होऊन राष्ट्रवादीत गेले. शरद पवारांना देव मानून निवडून न येण्याच्या भितीपोटी शिवसेनेत आले‌. नारायण राणेंच नाव घेऊन राष्ट्रवादीशी गद्दारी केली. आता उद्धव ठाकरेंशी गद्दारी करत शिंदे गटात गेलेत. बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी शिंदेंसोबत गेल्याच ते सांगत आहेत. परंतु, केसरकर यांनी २०१४ ला सेनेत प्रवेश केला. बाळासाहेबांच निधन त्या आधी झालं. मग, बाळासाहेबांच्या विचारांबद्दल बोलण्याची नैतिकता त्यांना आहे का ? असा सवाल माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी केला. 


तर शिक्षणमंत्री कोणत्या खात्याच काम करत आहेत हे त्यांना ठावूक आहे का ? चार बाय चारचे बॅनर न लावणारे चाळीस बाय चाळीसची होर्डींग्ज लावत आहेत. हा पैसा आला कुठुन ? आम्ही वडापाव खावून तुमच्यासोबत काम केलं. आजारी कार्यकर्त्यांना रूपयाची मदत केली नाही. आज लाखोंची पाकीट वाटता आहात हा पैसा आला कुठुन? आता कुठल्या जमिनी विकल्या की वाढल्या ? हे जाहीर करावं. 


विकास कुठे आहे ? लोकांची दिशाभूल करत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं दवाखाना उभारला मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं पण डॉक्टर नाही म्हणून दवाखाना बंद आहे. आपल्या इगोसाठी आठवडा बाजार हलवला. जवळ शाळा कॉलेज असताना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. स्वताच्या हट्टासाठी हे करत आहेत. चांदा ते बांदाच्या कामासाठी आता तुम्हाला कोण अडवत आहे ? केसरकर आता लोकसभेत विनायक राऊत यांना पराभूत करण्याची स्वप्नं पाहत आहेत. खासदारकी सोडा साधा नगरसेवक, नगराध्यक्ष तुमचा निवडून येऊ शकत नाही. आमदारकी खासदारकी तर लांबची गोष्ट आहे. आमचा सामान्य शिवसैनिक, शाखा प्रमुख तुमचा पराभव करणार, सर्व पक्ष फिरून झाले आता भाजपात लवकर जावा आणि पावन होऊन घ्या अस विधानं मायकल डिसोझा यांनी केल.