
सावंतवाडी : पुणे-हिंजवडी येथील सराफी पेढीवर दरोडा टाकून पसार झालेल्या तीन संशयितांना सावंतवाडी पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ६ ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्ताफ खान -वय २४, राजस्थान, गोविंद दिनवाणी - वय २२ वर्षे, राजस्थान, राजुराम बिष्णोई वय - २६ राजस्थान अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी सायंकाळी आंबोली पोलिसांनी या तीन आरोपींना दोन रिव्हॉल्व्हर ,आठ जिवंत काडतुसांसह जेरबंद केले. पोलिस हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई,आबा पिळणकर, दिपक शिंदे,अभिजीत कांबळे यांनी स्वताच्या जीवावर उदार होत या दरोडेखोरांना पकडले.