मुख्यमंत्र्यांंच्या दौऱ्यात अशी आहे पार्किंग व्यवस्था

Edited by:
Published on: June 05, 2023 19:02 PM
views 163  views

सिंधुदुर्ग :

उद्या दिनांक 06.06.2023 रोजी कुडाळ हायस्कूल कुडाळ मैदानांवर मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे प्रमुख उपस्थितीत शासन आपल्या दारी हा शासकीय कार्यक्रम होणार असून त्यासाठी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलीस विभागाकडून खालील प्रमाणे वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.


1)सकाळी 0800 ते 16.00 हॉटेल अभिमन्यू तिठा - बालोद्यान -SN देसाई चौक हा रस्ता  सर्व वाहनासाठी प्रवेश बंद राहील.


2)हॉटेल अभिमन्यू तिठा - CT सेंटर तिठा - SN देसाई चौक हा रस्ता मंत्री महोदय आगमन व निर्गमन चे मुदतीत काही काळ बंद ठेवण्यात येईल.याची नोंद घ्यावी व शक्यतो पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.


पार्किंग व्यवस्था

1) तालुका क्रीडा संकुल मैदान:- ST पार्किंग.


2) काळप नाका बस डेपो :- ST पार्किंग


3) गवळदेव मंदिर शेजारी :- चारचाकी खाजगी पार्किंग


4) तालुका क्रीडा संकुल मैदान शेजारी:- चारचाकी खाजगी पार्किंग.


5) तहसीलदार कार्यालय परिसर :- सरकारी वाहन पार्किंग


6) ACB कार्यालय रस्ता:- दुचाकी व चारचाकी खाजगी पार्किंग


वरील ठिकाण व्यतिरिक्त कार्यक्रम परिसरामध्ये कोठेही वाहन पार्किंग करून नये. असं आवाहन पोलीस निरीक्षक कुडाळ यांनी केलं आहे.