सिंधुदुर्गात असं होणार मॉकड्रिल

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 06, 2025 20:29 PM
views 68  views

सिंधुदुर्ग : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील 16  ठिकाणांचा यात समावेश असून, बुधवार दि. 7 मे रोजी मॉक ड्रिल्स केले जाणार आहे.  या 16 ठिकाणांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश असल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये उद्या दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल तर रात्री 8 वाजता ब्लॅक आऊट करण्यात येणार आहे. यावेळी आरोग्य यंत्रणाअग्निशमन दलरुग्णवाहिकाप्रथोमोपचार या बाबी सज्ज असणे आवश्यक आहे.  यामध्ये  आपदा मित्र आणि नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक यांचा समावेश असणार आहे . या कालावधीत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.


            जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रभारी पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापणचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी याबाबतची आढावा बैठक देखील पार पडली.


या ठिकाणी होणार मॉकड्रिल


जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की मॉकड्रिल घेण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. युद्धजन्य किंवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी कोणती सर्तकता बाळगावी, तसेच प्रशासनाने कोणती पावले उचलावीयासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आपल्या  संपूर्ण जिल्ह्यात  दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल करण्यात येणार आहे.  जिथे सायरनची व्यवस्था आहे तिथे ठिक 4:00 वाजता 2 मिनिटांसाठी सायरन चढ -उताराच्या स्वरुपात वाजेल. सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी स्वत: सुरक्षित स्थळी जावे. 4:18 मिनिटांनी 1 मिनिटांसाठी शेवटचा सायरन वाजेल. त्यांनतर मॉक ड्रिल संपेल आणि आरोग्य विभाग, अग्निशमन दल, पोलिस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणा मदतीसाठी धावणार आहे. ज्या ठिकाणी सायरनची व्यवस्था आहे अशा ठिकाणी (मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली, देवगड, जिल्हाधिकारी कार्यालय आणि तिलारी धरण क्षेत्र) सायरन वाजविण्यात येणार आहे. ग्रामीण भागात संबंधित ग्रामपंचायतींनी  व ज्या बॅकांमध्ये सायरनची सुविधा आहे अशा ठिकाणी सुध्दा जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी सायरन बाबत कार्यवाही करण्याच्या  सूचना देखील जिल्हाधिकारी म्हणाले.


सागरी भागात ब्लॅक आऊट


प्रभारी पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले म्हणाले की, या मॉक ड्रिल दरम्यान सर्व नागरिकांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे. या  मॉक ड्रिल दरम्यान स्वयंसेवक, एनसीसी, एनएसएस तसेच एनजीओंची देखील मदत घेतली जाणार आहे. या मॉक ड्रिल दरम्यान जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनांतर्गत नियंत्रण कक्ष देखील कार्यरत राहणार आहे. मॉक ड्रिल नंतर या कार्यवाहीचा अहवाल सादर केला जाणार आहे. रात्री 8:00 ते 8:15 दरम्यान देवगडवेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागात ब्लॅक आऊट करण्यात येणार आहे म्हणजेच या पंधरा मिनिटांत या परिसरातील वीज पूर्णपणे बंद केली जाणार आहे. जेणेकरुन शत्रूंना विमानांना त्यांचे लक्ष्य दिसू नये. या दरम्यान नागरिकांनी शक्यतो उजेड होणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो वाहने जागेवरच थांबवावीत, नसता एकदम कमी प्रकाशात वाहन चालवावे असेही त्यांनी सांगितले.