राणे समर्थकांना संपवण्यासाठी पालकमंत्र्यांचा हा गेम

CM शिंदेंच्या बॅनर हटवण्यावरून योगेश धुरींचा निशाणा 
Edited by: भरत केसरकर
Published on: June 07, 2023 19:02 PM
views 84  views

कुडाळ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताला भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी कुडाळ येथील कार्यक्रमात लावलेले बॅनर पालकमंत्र्यांनी हटवले असून भाजपमधील ही अंतर्गत कुरघोडी आता लोकांसमोरच आली आहे. विशाल परब हे भाजपचे युवा नेतृत्व असून ते नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. राणे समर्थकांना भाजपचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे संपवण्याचा काम करत आहेत आणि विशेषता माणगाव खोऱ्यातून उदयाला आलेल्या विशाल परब सारख्या युवा नेतृत्वाला रवींद्र चव्हाण अशा पद्धतीने राजकीय दबावबाटी ठेचून टाकत आहेत. असा घणागती आरोप युवा सेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी केला आहे.योगेश धुरींच्या या राजकीय आरोपाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.योगेश धुरी हे येथे पत्रकार बोलत होते.

     योगेश धुरी हे यावेळी बोलताना म्हणाले की काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा सावंतवाडी आणि कुडाळ मध्ये होता. भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी संपूर्ण जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचे स्वागताचे बॅनर लावले होते. एकनाथ शिंदे सावंतवाडीच्या दौरा आटपून कुडाळ येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमास जाण्यास निघाले असता, तिथे उपस्थित असलेल्या  रवींद्र चव्हाण यांना विशाल परब यांचे हे बॅनर नजरेस पडले. आणि पालकमंत्र्यांनी तात्काळ हे बॅनर काढण्याचे आदेश दिले. काही मिनिटातच हे बॅनर कार्यक्रम स्थळाहून होऊन हटवण्यात आले. मात्र या हटवण्यात आलेल्या बॅनरची जोरदार चर्चा होती.

विशाल परब माणगाव खोऱ्यातील नेतृत्व असून भाजपचा हा युवा नेतृत्वाने बॅनरबाजी व अन्य समाज उपयोगी उपक्रमाने तळागाळात आपले स्थान निर्माण केले आहे. गेल्या वर्ष दोन वर्षात विशाल परब यांची वाढती लोकप्रियता बघून त्याचा पोटशूळ कदाचित पालकमंत्र्यांना आला आहे. त्याच हव्यासापोटी त्यांनी हे बॅनर आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांचे हटवले आहेत. विशाल परब यांची वाढती लोकप्रियता बघून सिंधुदुर्गाचे पालकमंत्री हे सध्या गोंधळून गेल्याचे पाहायला मिळत आहे.विशेषता राणे समर्थकांना संपवण्याचा घाट हा पालकमंत्र्यांनी घातला असून भाजप अंतर्गत कुरघोडीनेच संपणार असल्याचा दावा योगेश धुरी यांनी केला आहे.तर पक्षांतर्गत राजकारणाचे विशाल परब हे बळी ठरू शकतात अशी टीकेची झोड पालकमंत्र्याशर त्यांनी उठवली आहे.युवासेनेचे योगेश धुरींनी याबाबत जोरदार टीका केली आहे.