
सावंतवाडी : गणेशोत्सवात सावंतवाडीत चोरांचा सुळसुळाट पहायला मिळत आहे. सालईवाडा भागातील तीन बंद फ्लॅट चोरट्याने फोडलेत. तसेच पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न केला गेला आहे. गणेशोत्सवात फ्लॅटधारक घरात नसल्याची संधी साधून चोरीचा प्रयत्न केला गेला.
सालईवाडा भागात तीन बंद फ्लॅट चोरट्याने फोडलेत. यात अंदाजे वीस हजार रुपयांची रक्कम चोरीला गेली आहे. आज सायंकाळी ही घटना घडकीस आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. तसेच गणेशोत्सवाच्या पहिल्या तिन दिवसांत पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर फ्लॅट फोडण्याचे प्रकार झाले