प. पू. संत राऊळ महाराज समाधी मंदिरात चोरट्यांचा डल्ला

दोन चांदीच्या मूर्ती, पादुका, 30 हजार पळविले
Edited by: कुडाळ प्रतिनिधी
Published on: January 04, 2025 16:33 PM
views 474  views

चोरटे CCTV त कैद 

कुडाळ : पिंगुळी येथील प. पू. संत राऊळ महाराज यांच्या समाधी मंदिरात अज्ञात चोरांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे.  दरम्यान शुक्रवार दिनांक ३ जानेवारी रोजी पहाटे पावणे ३ वाजण्याच्या सुमारास आलेल्या ४ अज्ञात चोरटयांनी चोरी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

चोरटयांनी चांदीची मूर्ती व फंड पेटी तसेच प पू विनायक अण्णा महाराज यांच्या समाधी मंदिरातील चांदीची दत्ताची मूर्ती व फंड पेटी फोडून चोरी केली असून दोन फंड पेटीतील सुमारे 30 हजार रुपये तसेच सुमारे १३ किलो वजनाच्या दोन चांदीच्या मूर्ती व पादुका चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघड झाले आहे. या चोरीच्या घटनेने पिंगुळीसह कुडाळ मध्ये एकाच खळबळ उडाली आहे.

चारही चोरटे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत . घटनेची माहिती मिळताच कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि टिम पिंगुळी मठात दाखल झाली असून श्वान पथक तसेच ठसे तज्ञही दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे .