
कणकवली : शहरात मंगळवारी चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास कणकवली बस स्टँड शेजारी एका ज्वेलर्स समोर लावण्यात आलेली दुचाकी चोरट्याने चोरली. तर याच दरम्याने कणकवली बस स्टॅन्ड येथे 2 व संचयनी कॉम्प्लेक्स ते कल्प कॉर्नर या दरम्याने संजीव देसाई यांचा एक मोबाईल असे एकूण तीन मोबाईल चोरीस गेल्याच्या घटना घडली आहे. मंगळवार बाजाराचा फायदा आणि भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवास होणाऱ्या गर्दीचा फायदा या चोरट्यांनी घेत संधी साधली.