कारिवडे, चराठा भागात भुरट्या चोरांचा सुळसुळाट

ग्रामस्थांच्या डोक्याला मनस्ताप
Edited by:
Published on: February 09, 2025 19:10 PM
views 519  views

सावंतवाडी : कारिवडे, चराठा भागात भुरट्या चोरांचा सुळसुळाट आहे. या भागात काही घरे, काही कारखाने बंद असण्याचा फायदा घेऊन या ठिकाणी भुरट्या चोरांकडून घराच्या लोखंडी वस्तूची, त्यांच्या विहिरीचे पाईप लोखंडी वस्तू चोरण्याचा नवीन प्रकार सुरू झाला आहे. तसेच प्लास्टिक, कारखान्याची लहान मशनरी देखील भुरटे चोर कोणी घरात किंवा शेतात नसण्याचा फायदा घेऊन लंपास करत आहेत. 

पंपाचे पाईप, मोटर भीडाच्या वस्तू रात्रीच्या वेळी चोरून नेत आहेत. त्यामुळे नागरिक व उद्योजक हैराण झाले आहेत . आतापर्यंत असे प्रकार प्लॅस्टिक वायर, गाडीचे टायर अशा वस्तू चोरून नेत होते. त्यामुळे पोलिसांनी या परिसरात पेट्रोलिंग करून खबरदारी घ्यावी अशी नागरिकांतून मागणी होत आहे. चराठा ते माडखोल हा डांबरी रस्ता झालेला आहे. त्यामुळे भुरट्या चोरीचे प्रकार करणाऱ्यांचे फावले आहे. पहिल्यांदा माडखोल भागातही असेच प्रकार सुरू होते. आता चोर ग्रामीण भागातून शहरी भागात सरकत आहेत. तरी नागरिकांनी जागृत राहायला हवं. ही टोळी अपघात झालेल्या लहान मोठ्या गाड्याचे टायर, बॅटरी, आतला माल असे चोरत आहेत.