वेंगुर्ल्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 'हे' आहेत निवडणूक निर्णय अधिकारी..!

Edited by: दिपेश परब
Published on: October 06, 2023 16:58 PM
views 230  views

वेंगुर्ला : वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड, पेंडुर, खानोली, वायंगणी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुकांचे कामकाज सुरळितपणे व निःपक्षपातीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने तहसील कार्यालय वेंगुर्ला यांच्यामार्फत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

यात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खानोली ग्रामपंचायतसाठी पंचायत समिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रीतम कैवल्य पवार, वायंगणी ग्रामपंचायतसाठी विस्तार अधिकारी गुरुनाथ धूरी, मातोंड ग्रामपंचायत साठी विस्तार अधिकारी एस एस सावंत, ग्रामपंचायत पेंडूरसाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ सहाय्यक अजय नाईक व राखीव म्हणून कृषी पर्यवेक्षक एस बी देसाई यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती परिपत्रकामार्फत तहसील कार्यालय वेंगुर्ला यांच्या मार्फत देण्यात आली आहे.