वैभववाडीतील बंधा-याच्या कामाची चौकशी व्हावी | नगरसेविका अक्षता जैतापकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 12, 2024 14:41 PM
views 200  views

वैभववाडी : नगरपंचायतीच्यामाध्यमातून  माईणकरवाडीनजीक  सुखनदीवर  ४९ लाख रूपये खर्चुन बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.या  कामाची चौकशी करण्यात अशी मागणी वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या नगरसेविका अक्षता जैतापकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या माध्यमातुन ४९ लाख रूपये खर्चुन येथील सुखनदीवर बंधारा बांधण्यात आला आहे.या बंधाऱ्याचे योग्य पध्दतीने झाले नसल्याचा आरोप यापुर्वीच सौ.जैतापकर यांनी केला होता.या बंधाऱ्यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांकडे कामाच्या अहवालाची मागणी देखील केली होती.परंतु मुख्याधिकाऱ्यांकडुन कोणतीही मागणी न मिळाल्यामुळे आता सौ.जैतापकर यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे.त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत बंधाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.अंदाजपत्रकानुसार हे काम झालेले नाही असा त्यांचा आक्षेप आहे.बंधाऱ्याचे काम करताना जमीनीतील कातळाची टेस्टींग केली जाते परंतु नगरपंचायतीने टेस्टींग केलेली नाही असा आरोप त्यांचा आहे. सद्या बंधाऱ्यात अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही.बंधाऱ्यांच्या खालुन पाणी वाहुन जात आहे. त्यामुळे तीन ते चार फुट पाणीसाठा होण्याऐवजी केवळ दीड ते दोन फुटच पाणीसाठा झालेला आहे.हा बंधारा चुकीच्या पध्दतीने बांधण्यात आल्यामुळे ही स्थिती आहे.४९ लाखाचा केवळ अपव्यय झाला असुन या बंधाऱ्यांची सखोल चौकशी करावी.

येत्या पंधरा दिवसांत या कामाची चौकशी होवुन आपल्याला कामासंदर्भातील अहवाल मिळाला नाही त्यानंतर कधीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.याबाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले,सुखनदीवरील बंधाऱ्यांच्या कामांचे शासकीय यंत्रणेकडुन परीक्षण झालेले आहे.या बंधाऱ्यामुळे लगतच्या विहीरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.या बंधाऱ्यांचे काही काम अजुनही शिल्लक आहे.याशिवाय ठेकेदाराला पुर्ण बिल अदा केलेले नाही.जी कामे शिल्लक आहेत ती पुर्ण करून घेतली जाणार आहेत ,अस स्पष्टीकरण दिले.