कुडाळमध्ये असं आहे बलाबल..!

Edited by:
Published on: November 06, 2023 19:28 PM
views 1863  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यात झालेल्या पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वालावल ग्रामपंचायतीवर निर्विवाद भाजपचा झेंडा फडकला तर भडगाव बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेला भाजपने धूळ चारली तसेच हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता ग्रामस्थांनी उढळून लावली. भाजपला मोठ्या प्रमाणावर मतांचा कौल देण्यात आला. त्यामुळे तालुक्यामध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यामध्ये कार्यकर्ते यशस्वी झाले आहे. या निवडणुकीमध्ये सरपंच पदी निवडून आलेल्या वालावल राजेश उर्फ राजा प्रभू (भाजपा), भडगाव बुद्रुक गुणाजी लोट (भाजपा), हुमरमळा -अणाव समीर पालव (गाव पॅनल), वर्दे महादेव पालव (उबाठा सेना), हुमरमळा- वालावल अमृत देसाई (उबाठा सेना) यांचा समावेश आहे.

कुडाळ तालुक्यामध्ये पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर दोन ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुका झाल्या या निवडणुकांचा निकाल कुडाळ तहसील कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केला या निवडणुकीमध्ये वालावल ग्रामपंचायतीवरील सत्ता भाजपने राखली.

या ग्रामपंचायती वर भाजप प्रणित पॅनलची सत्ता यापूर्वी होती यावेळी सुद्धा ही सत्ता राखून विरोधकांचा सपाटा केला या निवडणुकीमध्ये आमदार वैभव नाईक यांनी वालावल मध्ये अनेकांना वेगवेगळ्या प्रकारे आमिष आणि वाळू बंद करण्यासंदर्भात तंबी दिली होती मात्र या ठिकाणी ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांना पूर्णपणे नाकारले या निवडणुकीमध्ये राजेश उर्फ राजा प्रभू यांना ८३८ मध्ये मिळून ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले तर सागर पाटकर यांना ३८४ मते मिळाली नोटा ८ मते, प्रभाग १ मध्ये समीक्षा गोवेकर (२६८ मते विजय), देवयानी वालावलकर (१४३ मते), नोटा ५ मते, जनार्दन बंगे (२३२ मते विजय), हेमंत वालावलकर (१८२ मते), नोटा २ मते, पूर्वा आडेकर (२६५ मते विजय), अक्षता वालावलकर (१८२ मते), नोटा २ मते, प्रभाग २ मध्ये साक्षी कवठणकर (२९६ मते विजय), शुभदा कुंडेकर (२९६ मध्ये विजयी), यशश्री वालावलकर (२७२ मते विजय), रिया कोचरेकर (१३५ मते), पूजा राऊळ (१७१ मते), वंदना हळदणकर (१०० मते), नोटा २० मते, प्रभाग ३ मध्ये मनोज पाटकर (२७४ मते विजयी), विलास मयेकर (१०८ मते), नोटा ४ मते, प्राची हळदणकर (२७२ मते विजयी), रवींद्र गावडे (१०९ मते), नोटा ५ मते.

भडगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत भाजपचा झेंडा फडकला

गेले काही वर्ष शिवसेने कडे असलेली भडगाव बुद्रुक ग्रामपंचायत यावेळी भाजपने एक हाती या ग्रामपंचायतीवर विजय मिळवला या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी ३ उमेदवार होते यामध्ये भाजपच्या उमेदवार गुणाजी लोट यांना ४११ मते मिळून ते विजयी झाले तर प्रमोद लोट यांना २९६ मते, गिरीश बेलुसे यांना ६६ मते तर नोटा ८ मते मिळाली. प्रभाग १ मध्ये राजेंद्र राणे (९५ मते), विजयी गौरव लोट (८३ मते), समीर सावंत (१४ मते), नोटा १ मत, अमिता सावंत (१०२ मते विजय), नीलम लोट (८७ मते), नोटा ४ मते, प्रभाग २ मध्ये प्रितेश गुरव (२२६ मते विजय), सुरेश गुरव (८६ मते), नोटा ८ मते. आरती जडये (२१० मते विजय),  रोजमारी बुतेलो (१८८ मते विजय), स्नेहल नाईक (११२ मते) सोनाली सावंत (१११ मते), नोटा ११ मते, प्रभाग क्रमांक ३ मध्ये प्रथमेश मोहिते (१४१ मते विजयी), राजाराम गुरव (१०२ मते), गिरीश बेलुसे (२३ मते), नोटा २ मते, अंकिता सावंत (१४२ मते विजय), पूजा कदम (११९ मते), नोटा ७ मते.

हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायतीमध्ये भाजपची एन्ट्री

या ग्रामपंचायतीमध्ये गेले कित्येक वर्ष उबाठा सेनेची सत्ता होती एक हाती सत्ता असलेल्या या ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत मात्र भाजपने जोरदार मुसंडी मारली शिवसेनेचे पदाधिकारी अतुल बंगे यांच्या अस्तित्वाला धक्का दिला सरपंच पदाची निवडणूक अटीतटीची झाली यामध्ये शिवसेनेच्या अमृत देसाई यांना ३५६ तर भाजपच्या कृष्णा परब यांना २९२ मते मिळाली यामध्ये अमृत देसाई यांचा ६४ मतांनी विजयी झाला या ठिकाणी अतुल बंगे यांनी भाजपचे अस्तित्व नाकारले होते मात्र या निवडणुकीमध्ये भाजपचे अस्तित्व त्यांना दिसून आले त्यामध्ये तीन ग्रामपंचायत सदस्य भाजपची निवडून आले. प्रभाग १ मध्ये वीरेंद्र सावंत (१५७ मते विजय), संदेश जाधव (१४७ मते), नोटा १ मत, हेमांगी कद्रेकर (१६३ मते विजय), प्रणिता परब (१५२ मते विजयी), सोनाली देसाई (१३९ मते) प्रतीक्षा परब (१४८ मते) नोट ४ मते. प्रभाग २ मध्ये मितेश वालावलकर (१२० मते विजय), प्रशांत पारकर (८१ मते), नोटा २ मते, संजना गुंजकर (११७ मते विजय), समीक्षा परब (८४ मते), नोटा २ मते, प्रभाग ३ मध्ये ऋषिकेश उपाध्ये व सतीश मांजरेकर यांना ७३ मते मिळाली समान मते मिळाल्यामुळे पाच वर्षीय चिन्मय गोसावी या विद्यार्थ्याकडून चिठ्ठीद्वारे विजय जाहीर करण्यात आला यामध्ये भाजपचे ऋषिकेश उपाध्ये हे विजयी झाले.

हुमरमळा (अणाव) येथे गाव पॅनलचा सरपंच

या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पालव कुटुंबीयांमध्ये रस्सीखेच होती निवडणुकीसाठी पाच उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात होते यामध्ये गाव पॅनलचे समीर पालव यांना २२० मते मिळून ते विजयी झाले तर उबाठा सेनेचे माजी उपसभापती जय भारत पालव यांचा मुलगा प्रणित पालव याला १५५ मते मिळवून पराभूत झाला. गजानन पालव (१२८ मते), तानाजी पालव (१८१ मते), मधुसूदन पालव (८९ मते), नोटा ४ मते, प्रभाग १ मध्ये अनिल कदम (१२५ मते विजय), संभाजी परब (९८ मते), गोविंद पालव (५९ मते), सुरेंद्र राणे (६ मते), नोटा १ मत. श्रिया चव्हाण (१३५ मते विजय), मनस्वी पालव (१७० मते विजय), नर्मदा पालव (११९ मते), समीक्षा पालव (९७ मते), ऋतुजा शेलार (८५ मते), नोटा १२ मते. प्रभाग २ मध्ये संचिता पालव (१५३ मते विजय), समृद्धी पराडकर (१२३ मते), नोटा १२ मते. शुभम पालव (१५२ मते विजय), परशुराम पालव (१२४ मते), नोटा १२ मते. प्रभाग ३ मध्ये प्रफुल्ल (८१ मते विजय), राकेश पालव (५९ मते), सतीश पालव (८ मते), नोटा २ मते स्मिता राणे (९३ मते विजय), भारती राणे (७६ मते), नोटा १ मत.

वर्दे ग्रामपंचायतीवर उबाठा सेनेचा झेंडा

वर्दे ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी ५ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये उबाठा सेनेचे महादेव पालवे यांना ३०८ मते मिळून ते विजयी झाले. तर भाजपचे विजय उर्फ गुंडू सावंत यांना २४६ मते मिळाली तसेच निलेश जाधव (९७ मते), दिलीप सावंत (७८ मते), धोंडी सावंत (२९ मते), आणि नोटा ६ मते मिळाली. प्रभाग १ मध्ये साक्षी पालव (१७८ मते विजय), भक्ति सावंत (१८८मते विजय), संगीता सावंत (१३७मते), संजीवनी सावंत (११४ मते), नोट ८ मते, प्रभाग २ मध्ये भिकाजी सावंत (१०१ मते विजय) हरिश्चंद्र गायतोंडे (७४ मते), सायली गावडे (९८ मते विजय), हर्षदा गायतोंडे (७७ मते), नोटा २ मते, प्रभाग ३ मध्ये प्रदीप सावंत (१२८ मते विजय) सचिन सावंत (७९ मते), भरत कदम (६१ मते), नोटा ४ मते, संपदा जाधव (१४९ मते विजय), काजल सावंत (१२१ मते), नोटा २ मते.

पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला 

गावराई ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत प्रणिता मेस्त्री या भाजपाच्या विजयी झाला त्यांना १३७ मध्ये पडली त्यांच्या प्रतिस्पर्धी दिपाली धुरी यांना ११६ मते पडली ५ मते नोटासाठी पडली. तेंडोली पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या मीनाक्षी वेंगुर्लेकर विजयी झाल्या त्यांना १९८ मते पडली तर शुभांगी तेंडुलकर शिवसेना शिंदे गटाच्या याना १६९ मते पडली नोटा ला ७ मते पडली शिंदे गटाच्या उमेदवाराला भाजपने पाठिंबा दिला होता.