जिल्हा कॉंग्रेसमध्ये पुन्हा धुसफूस...?

Edited by: विनायक गावस
Published on: September 28, 2023 11:53 AM
views 546  views

सावंतावडी : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बदलानंतर पक्षात पुन्हा एकदा धुसफूस पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावनाना पक्षात किमंत दिली जात नसेल तर सर्व पदाधिकारी सामुहिक राजीनामे देत आहोत. ते राजीनामे मंजूर करावेत, चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदाबाबत जशी स्थगिती देण्यात आली तशी स्थगिती देवून निर्णय व्हावा अशी मागणी जिल्हा कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे‌. ‌

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी समीर वंजारी यांची आपण नियुक्ती केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या मागील सभेत इर्शाद शेख यांना पुढील येणाऱ्या निवडणूका लक्षात घेता नियमित अध्यक्ष म्हणून नेमणूक देण्यात यावी. येणाऱ्या निवडणूकी पर्यंत कोणताही बदल करू नये असा ठराव मंजूर करून तो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला पाठविण्यात आला होता.  समीर वंजारी यांना  सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करून सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी शशांक बावकर यांच्या उपस्थितीत केलेल्या ठरावाला केराची टोपली दाखवली आहे. हा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या तमाम पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा अपमान आहे.

जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावनांना पक्षात किमंत दिली जात नसेल तर आम्ही सर्व पदाधिकारी सामुहिक राजीनामे देत आहोत. आमचे राजीनामे मंजूर करावेत ही विनंती. चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदा बाबत जशी स्थगिती देण्यात आली तशी स्थगिती देवून निर्णय व्हावा अशी मागणी केली आहे. विकास सावंत, अभय शिरसाट , महेंद्र सांगेलकर, हिरोजी परब आदींसह कॉग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सह्या असणार हे पत्र प्रदेशाध्यक्षांना पाठवल आहे.