केटी बंधाऱ्याच्या प्लेटमुळे पाणी भरवस्तीत घुसण्याची शक्यता

सुशांत नाईक आक्रमक
Edited by:
Published on: May 24, 2025 14:46 PM
views 210  views

कणकवली : कणकवली शहरातील कनकनगर व शिवशक्तीनगर येथील केटी बंधाऱ्याला उन्हाळ्यात पाणी अडवण्यासाठी घातलेल्या प्लेट लघु पाटबंधारा विभागाने न काढल्याने नदीने रौद्ररूप धारण केले आहे. यामुळे पाणी भरवस्थित घुसण्याची भीती येथील नागरिकांच्या मनात आहे. नदीने आपली पातळी ओलांडून पाणी नागरिकांच्या घरात घुसले तर आला जबाबदार कोण? असा सवाल सुशांत नाईक यांनी विचारला.

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कनकनगर येथील बंधाऱ्यावर जात पाहणी केली व लघुपाट बंधाऱ्याच्या शिंदे मॅडम यांच्याशी फोन द्वारे चर्चा केली व लवकरात लवकर नदीच्या प्लेट काढण्यात यावे अशी मागणी केली. शिंदे मॅडम यांनी लवकरात लवकर काही प्लेट काढण्याची ग्वाही दिली. गेले 4 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. लघु पाटबंधरा विभागाने ह्या केटी बंधाऱ्याच्या प्लेट या आधीच काढणे अपेक्षित होते. प्रशासनाच्या भोंगाळ कारभारामुळे याचा नाहक त्रास नागरिकांना होऊ नये. नाहक त्रास नागरिकांना झाल्यास शिवसेना गप्प बसणार नाही. कणकवली तालुक्यातील अश्या सर्व केटी बंधाऱ्याच्या प्लेट लवकरात लवकर काढण्यात याव्या अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासोबत बाबू जाधव, गुरु मोरये, सुमित राणे, संतोश सावंत,अजित काणेकर, रवि भंडारे आदी नागरिक उपस्थित होते.