...तर हॉस्पिटल बंद ठेवा असं लेखी द्या : डॉ. जयेंद्र परूळेकर

अतिदक्षता विभागातील पेशंटला डिस्चार्ज देण्याची आली वेळ
Edited by: विनायक गांवस
Published on: February 22, 2023 14:51 PM
views 192  views

सावंतवाडी : डॉ. भाऊसाहेब परूळेकर नर्सिंग होम या हॉस्पिटलच्या शेजारच्या जागेत एक गृहनिर्माण प्रकल्प आहे. या ठिकाणी एक प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. तर दुसर बांधकाम ८ वर्षांपासून तसच आहे. ते पाडून त्या ठिकाणी मोठी इमारत होणार असं समजत आहे. ते व्हावं, शहरीकरण होतंय त्यासाठी शुभेच्छा. परंतु, हे उभं केलेलं स्ट्रक्चर पाडण्यासाठी हॉस्पिटलच्या २० मिटरच्या आत पोकलेन व व्हायब्रेटर आणून हे पाडण्याच काम होतंय. त्यामुळे हॉस्पिटलला हादरे बसत आहेत. जोरात आवाज असून यामुळे अतिदक्षता विभागातील पेशंटला डिस्चार्ज देण्याची वेळ आली.


याची दखल घेण्यासाठी सावंतवाडीचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना रितसर फोन करून कल्पना दिली. त्यांनी लक्ष घालतो असे सांगितले. तर दोनच दिवसांत हे बांधकाम पाडून पूर्ण होईल असं सांगितलं. आज तिसरा दिवस आहे. अजून पाच दिवस हे काम सुरू राहील. हे कुणाच कन्स्ट्रक्शन आहे ? याची माहिती मिळावी. याबाबत लेखी तक्रार प्रांताधिकारी यांच्याकडे करणार आहे. त्यांनी सांगाव हे बांधकाम तोडण महत्वाच आहे. आजूबाजूच्या लोकांना होणारा त्रास, हॉस्पिटलला होणारा त्रास हा दुय्यम आहे. त्यामुळे हॉस्पिटल ८ दिवस बंद ठेवा असं लेखी द्या असं मत डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


दरम्यान, आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनाच्या लोकार्पणावेळी उपस्थित केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ. नितेश राणे हे रिफायनरी विरूद्ध लिहील्यान बळी गेलेल्या पत्रकार शशिकांत वारीसेंना श्रद्धांजली अर्पण करायला विसरले‌. जांभेकरांच स्मारक उभं राहत असताना वारिसेंना श्रद्धांजली अर्पण करण आवश्यक होत. घातपात प्रकरण होऊन १४ दिवस होण्याआधीच याचा विसर पडण योग्य नाही असं मत डॉ. परूळेकर यांनी व्यक्त केल.