...तर मोठा अनर्थ घडू शकतो

Edited by: विनायक गावस
Published on: July 31, 2023 11:43 AM
views 321  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी परिसरामधील 15 फुट उंच चिऱ्याची संरक्षण भिंत पूर्णपणे हॉस्पिटल अपघात विभागाच्या दिशेने झुकलेली आहे. ही चिऱ्याची भिंत त्या दिशेने पडल्यास मोठ्या प्रमाणात अनर्थ घडू शकतो.

अपघात विभाग जवळ असल्यामुळे लोकांची कायम वरदळ त्या ठिकाणी असते तसेच वरच्या रस्त्याच्या  बाजूला गोरगरिबांचे स्टॉल आहेत ते ही स्टॉल हॉस्पिटलच्या दिशेने खाली कोसळू शकतात. याची दखल घेऊन सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते बांधकाम विभागाला निवेदन देऊन चिऱ्याच्या संरक्षण भिंती संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्यासाठी आवाहन करणार आहेत.