
वैभववाडी : शहरातील ६बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली.यातील तीन घरांमधील मुद्देमाल चोरीस गेला आहे.चार संशयित चोरटे एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.एकाचवेळी झालेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाभवे वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक बारा आणि तेरा प्रभागामधील सहा बंद घरे चोरट्यांनी फोडली. घरातील कपाटातील सर्व साहीत्य त्यांनी विस्कटुन काही टाकले . सहापैकी तीन घरातून रोख रक्कमेसह दागिने चोरट्यांनी लंपास केले.उर्वरीत तीन घरांमध्ये त्यांच्या हाती काहीच लागले नाही.एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेरात हे चोरटे कैद झाले आहेत.त्यात ते चौघे जण असल्याचे दिसत आहेत.पोलीसंनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.
नगरपंचायतीचे सीसीटीव्ही बंद..शहरात लाखों रुपये खर्च करून नगरपंचायतीने सीसीटीव्ही बसविले आहेत.शहरातील सर्व प्रभागात हे सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.परंतु हे सीसीटीव्ही बंद अवस्थेत आहेत.यावरुन नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.