
दोडामार्ग : झरेबांबर गावठाणवाडी येथील काजल रमेश सावंत व सीताबाई धरणे या दोघांच्या घराच्या छप्पराची कौले काढून अज्ञाताने रोख रक्कम व कानातील दागिने अशी ४५ हजारांच्या मुद्देमालासह चोरी केली आहे. २७-२८मे च्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला. दोन्ही घरांचे कौले काढून चोरट्याने चोरी केली आहे.
यात सावंत यांचे सोन्याचे दागिने व रोख १६ हजार व सीताबाई यांचे रोख १७ हजार अशी चोरी झाली आहे. याबाबत झरेबांबर गावठाणवाडी येथील काजल रमेश सावंत वय २६ यांनी दोडामार्ग पोलिसांत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी या चोरी प्रकरणी अज्ञात गुन्हेगार विरोधात गुन्हा दखल केला आहे.