सिंधुदुर्गचा तरुण सापडला कदंबा बस स्टँडवर

Edited by: ब्युरो
Published on: March 20, 2023 11:14 AM
views 134  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गचा एक तरुण कदंबा बस स्टँडवर आहे. काहीसा गोंधळलेल्या स्थितीत असल्याने चौकशी केल्यावर तो सिंधुदुर्गचा असल्याचं सांगत आहे. हा तरुण सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे - पेडवेवाडी इथला असल्याची माहिती आहे. या तरुणाचं नाव शंकर उर्फ तुषार श्रीरंग माळकर असल्याचं कळतंय. कारीवडे - पेडवे इथं हा तरुण हॉटेलमध्ये कामाला असल्याची माहिती आहे. याबाबत माहिती असल्यास त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येतेय.