खचलेल्या मुळस हेवाळे रस्त्याची युवक - ग्रामस्थांनी केली डागडुजी

जिल्हा परिषद बांधकाम विभागाने लक्ष देणे आवश्यक
Edited by:
Published on: August 04, 2024 07:26 AM
views 341  views

दोडामार्ग : हेवाळे गावाला मुख्य रस्त्यापासून न जोडणारा मुळस हेवाळे रस्ता भिडणीचा कणा येथे मुसळधार पावसामुळे खचल्याने गेले दोन दिवस वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला होता. अखेर शनिवारी हेवाळे गावातील युवावर्ग व ग्रामस्थांनी मिळून रस्ता खचलेल्या ठिकाणी दगडगोटे घालून रस्त्याची डागडुजी केल्याने रस्ता वाहतुकीस तात्पुरता सुरळीत झाला आहे. याठिकाणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. 

ग्रामपंचायत उपसरपंच समीर देसाई, ग्रामपंचायत सदस्य रुपेश कदम, माजी ग्रामपंचायत पंचायत सुनील सुतार, गोविंद गवस, उत्तम कदम, आदित्य देसाई, अक्षय देसाई, गोपाळ गवस, अमोल गवस, रोहन देसाई, नितेश सडेकर, अनिल पाटयेकर व  ग्रामस्थांनी या कामाला हातभार लावुन रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत केला. तसेच ग्रामपंचायत सदस्य  रुपेश कदम यांनी या कामासाठी आपल्याकडील वाहन उपलब्ध करून दिले. 

गणेश उत्सव महिन्यावर येऊन ठेपल्याने व हा मार्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागच्या अखत्यारीत असल्याने याची व्यवस्थित दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर गटार व्यवस्थापन व रस्त्याची साफसफाई सुद्धा आवश्यक आहे.