
कुडाळ : मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे.विशेषता कुडाळामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला आहे.कुडाळ हायवे नजिकच्या नविन एसटी डेपो जवळील रस्त्यावर पाणी आले असतानाही ओरोस येथील एक तरुण रात्री उशिरा पाण्यातून वाट काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र हा तरुण दुचाकी गाडी घेवून जात असताना तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जावू लागला.अशावेळी तेथे उपस्थित असलेल्या कुडाळतील तरुणांनी धाडस दाखवत त्याला वाचवले आहेत. आपल्या मोटरसायकलने हा तरुण पाण्यातून मार्गक्रमण करत होता. मात्र पुराच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हा तरुण वाहून जाऊ लागला. अशा वेळी काळपवाडी येथील सागर काळप,निकेश काळप,शैलेश धुरी,शैलेश काळप,अर्जुन सावंत,महेंद्र नाईक या युवकांनी या वाहत जाणारा तरुणाकडे धाव घेत त्याला वाचवण्यात यश आले आहे. मोटरसायकल वरून हा तरुण पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहत जात होता.अशावेळी या तरुणाला लक्ष्मीवाडी येथील तब्बल सहा युवकांनी अतिशय शिताफिने पकडत वाचवले आहे. कुडाळात पावसाने हाहाकार माजवला असून कुडाळ नविन एसटी डेपो परिसरात मोठ्य प्रमाणात पाणी घुसल्याने वाहतूक टप्प झाली आहे.तर नागरिकांचे मोठे हाल होत असून प्रशासनाने घराबाहेर पडू नये असे आदेश दिले असतानाही अतिउत्साही तरुण अशी स्टंटबाजी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.हा तरूण गाडी घेवून जाताना पाण्याच्य प्रवाहाबरोबर वाहत असून त्याला वाचवण्यात यश आले आहे.










