
देवगड : देवगड तालुक्यातील नाडण कानडेवाडी येथे विनायक मधुकर कानडे (३५) राहणार नाडण कानडेवाडी हे नाडण माडाची घोवी येथील स्वतःच्या मालकीच्या कलम बागेत गळफास लावलेल्या स्थितीत गुरुवारी सायंकाळी ७ वाजता दिसून आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार कानडेवाडी येथील ३५ वर्षीय विनायक मधुकर कानडे यांचा मृतदेह नाडण माडाची घोवी येथील आंबा कलम झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला आहे.
त्यांना तेथून खाली उतरून देवगड ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणण्यात आले .मात्र देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून ते मृत असल्याचे सांगितले.याबाबतची फिर्याद प्रकाश हरी कानडे वय ६५ राहणार नाडन कानडेवाडी यांनी देवगड पोलिसात दिली आहे. देवगड पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.विनायक यांच्या पश्चात आई ,पत्नी, मुलगा, असा परिवार आहे. याबाबत अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल आशिष कदम करत आहेत.