वर्ल्ड कपचा सामना पहात येणार एलईडी वॉलवर

एस एस मोबाईल सावंतवाडीच आयोजन
Edited by: विनायक गावस
Published on: November 18, 2023 21:58 PM
views 209  views

सावंतवाडी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनलची सर्वांना उत्सुकता आहे. सावंतवाडीतील क्रिकेट प्रेमींना उद्याचा हा अंतिम सामना एलईडी वॉलच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. सावंतवाडीच्या एस. एस. मोबाईलच्या माध्यमातून डॉ. अनिष स्वार व भार्गव धारणकर यांनी ही संधी उपलब्ध करून

दिली आहे. 


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनलची सर्वांना उत्सुकता आहे. उद्या रविवारी १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर फायनल रंगणार आहे. फायनल पाहण्यासाठी अनेक राजकीय - मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. सावंतवाडीतील क्रिकेट प्रेमींना उद्याचा हा अंतिम सामना एलईडी वॉलच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. सावंतवाडीच्या एस. एस. मोबाईलच्या माध्यमातून डॉ. अनिष स्वार व भार्गव धारणकर यांनी ही संधी उपलब्ध करून

दिली आहे. अंतिम सामन्याच प्रक्षेपण १० बाय १० च्या एलईडी वॉलवर एस.एस मोबाईल सावंतवाडी गवळी तिठा, एस टी स्टॅण्ड शेजारील शाखेच्या बाजूला पाहता येईल. जास्तीत-जास्त क्रिकेट रसिक व खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन एस.एस मोबाईलच्या माध्यमातून करण्यात आले आहे.